सावधान… लॉटरीचे आमिष दाखवत तुमचीही फसवणूक होऊ शकते !

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावधान (Beware) जर आपल्याला अनोळखी नंबरवरून कॉल येवून “कौन बनेगा करोडपती” (showing the lure of lottery!) मधून बोलत असल्याचे भासवत लाखो रूपयांचे आमिष दाखवत असेल तर खबरदार. तुम्हालाही लाखो रूपयांची ऑनलाईन चुना लागू शकतो त्यामुळे अनोळखी कॉलला प्रतिसाद देऊ नका नाहीतर तुमचीही फसवणूक होवू शकते. असाचा काहीसा प्रकार पारोळा तालुक्यात घडला आहे.

 

पारोळा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील टिटवे येथे मायाबाई पाटील या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ५ फेब्रुवारी रोजी मायाबाई पाटील याच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरुन व्हॉट्सअप कॉल आला. फोनवर बोलणाऱ्या संबधित व्यक्तीने मायाबाई यांना “कौन बनेगा करोडपती” स्कीममध्ये २५ लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याची बतावणी केली. ही रक्कम मिळण्यासाठी दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना एक कॉल आला.  मायाबाई यांनी हा प्रकार त्यांचे पती व मुलाला सांगितला. त्यानुसार त्यांनी मॅसेजमध्ये दिलेल्या नंबरवर फोन केला व त्यांना बँक खात्याचा नंबर मागितला. तुमचे बँक खात्यात कमी ठेवता येते. लॉटरीची एवढी मोठी रक्कम येण्यासाठी खात्याची मर्यादा वाढवावी लागेल अशी बतावणी केली. यासाठी समोरील व्यक्तीने मायाबाई यांना ऑनलाईन पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार मायाबाई यांनी गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून पहिल्यांदा १८५ रूपये टाकले. त्यानंतर चार वेळा ५ हजार रुपये, ३ हजार रुपये, २५ हजार, दोन वेळा १५ हजार , १० हजार , तीन वेळा २० हजार व ३५ हजार असे   एकूण १ लाख  ८४ हजार ८५० रुपये पाठवले. पैसे पाठवल्यावर कुठलीही लॉटरीची रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष भंडारी हे करीत आहेत.

Protected Content