जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तोतया पोलीस असल्याचे सांगत एखाद्या वृध्द व्यक्तीला हेरायचे… रस्त्यावर बेजबाबदारपणे कशाला फिरता असे सांगून वृध्दांचा विश्वास संपादन करून अंगावरील सोन्याचे दागिने, चैन, अंगठी काढून मोठ्या शिताफीने मुद्देमाल पोबारा करणे.. अश्या प्रकारची लुबाळणूक करणारी टोळ्या सक्रीय झाले आहे.
जळगाव शहरात आणि पाचोरा शहरात एका दिवशी अश्या दोन घटना घडल्या आहेत. यात पाचोरा शहरातील वृध्दाचे दोन अंगठ्या तर जळगाव शहरातील सेवानिवृत्त अधिकारी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि सोन्याची अंगठी असा मुद्देमाल पोबारा केला आहे.
मिळालेल्या माहिती अशी की, जळगाव शहरातील गणेश कॉलनीती सेवानिवृत्त गटविकास अधिकारी वसंत किसन साळुंखे (वय-७५) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ३० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ते त्यांची दुचाकीला गॅरेजवर दुरूस्तीला टाकून पुन्हा घरी पायी जात असतांना शहरातील आयएमआर महाविद्यालयजवळ दोन अनोळखी तरूण त्यांच्याजवळ आला. आपण एलसीबीचे पोलीस कर्मचारी असून आपण बेजबाबदारपणे गळ्यात सोन्याची चैन आणि अंगठी घेवून का फिरत असल्याचे सांगितले. तुम्ही गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी तुमच्या रूमालात ठेवा असे सांगितले. त्यावर वसंत साळुंखे विश्वास ठेवून गळ्यातील ६५ हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन व अंगठी ठेवली. त्यानंतर तरूणाने हातचालखी करून त्याच्याजवळील रूमाल त्यांच्या हात देवून साळुंखे यांच्याजवळील मुद्देमाल घेवून दुचाकीने पसार झाले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे वसंत साळुंखे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.