भडगाव (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समितीतर्फे ‘जल जन जागृती’ अभियानांतर्गत माध्यमिक शिक्षक कै. जयेश सुरेश अहिरे यांच्या स्मरणार्थ तालुक्यात वडजी व पिचर्डे या केंद्रावर नुकतेच राज्यस्तरीय निसर्गचित्र रंगभरण व पर्यावरण ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
वडजी येथील टी.आर.पाटील विद्यालय व पिचर्डे येथील जिजामाता माध्यामिक विघालयात ही रंगभरण स्पर्धा परिक्षा घेण्यात आली होती. वृक्ष,पाणी व पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांना आपुलकी निर्माण व्हावी, या उद्येशाने निसर्गमित्र समितीतर्फे १५ वर्षापासून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ही स्पर्धा महाराष्ट्र भर आयोजित करण्यात आली आहे. यात तालुक्यातील वडजी केंद्रावर वडजी, पाढरद, या गावातील ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर पिचर्डे केंद्रावर पिचर्डे व बात्सर गावातील १२५ विद्यार्थी परिक्षेस बसले होते
. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, भडगाव निसर्ग मित्र समितीचे तालुकाध्यक्ष धनराज पाटील, निसर्ग मित्र समितीचे ता.सल्लागार व जिजामाता माध्यामिक विघालयाचे मुख्याध्यापक दिपक बोरसे, वडजी येथील टी.आर पाटील विघालयाचे मुख्याध्यापक डी.डी. पाटील, वडजी विघालयाचे कलाशिक्षक वाय.ए.पाटील, इंग्लीश मीडीअमचे मुख्याध्यापक कैलास मोरे, उपशिक्षक किरण पाटील, एम.ऐ .भदाणे, राहुल जाधव, हर्षल पाटील, पिचर्डे शाळेचे उपशिक्षक एस.डी.पाटील, जी.के.देशमुख, कलाशिक्षक अभिजीत पवार, एन.एच. सोनार, उपशिक्षिका श्रीमती एल.एम.पाटील, के.डी.सोनवणे, लिपीक संजय पाटील, शिपाई संभाजी पाटील, ज्ञानेश्वर देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.