महात्मा फुले जन आरोग्य संकुलात अधिक प्रभावी वैद्यकीय सेवेचा रुग्णांना लाभ – खा. पाटील

चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोना महामारीत महात्मा फुले जन आरोग्य संकुलात शेकडो रुग्णांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळतो आहे. येथे दानशूरांकडून सातत्याने वैद्यकीय उपकरणांच्या भेटीचा ओघ वाढतो आहे. यामुळे महात्मा फुले जन आरोग्य संकुलात अधिक प्रभावी वैद्यकीय सेवेचा लाभ रुग्णांना मिळण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेश पाटील यांनी आज येथे केले.

 

महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रामा केअर सेंटर येथे अक्षर साधना फाउंडेशनच्या वतीने चाळीस पल्स ऑक्सिमीटर आज खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मंदार करंबेळकर यांना सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी चाळीसगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, नगरसेवक बापु आहीरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वामीनाथ भारत गॅसचे संचालक तथा अक्षरसाधना फाउंडेशन कार्यकारी अध्यक्ष , मेहुणबारे ग्रा.पं.उपसरपंच ऋषीकेश अमृतकार, अक्षर साधना मुख्य कार्यकारी अधिकारी  ऍड .कामिनी गिरासे, सी एस आर विभाग प्रमुख रोहन अमृतकर, फाऊंडेशनचे अध्यक्ष अक्षय कोठावदे यांच्या माध्यमातून हे चाळीस पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध करून देण्यात आले.

 

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बंडूदादा पगार, व्यापारी आघाडीचे अमित सुराणा,लोंजे ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, सुनील रणदिवे,मुख्य परिचारिका सुवर्णाताई राजपूत, मानसी लोखंडे, डॉ. अभिजीत देशमुख, मुकेश पाटील, राहुल पवार, विशाल तावरे, सरोजबाई  जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content