जळगाव प्रतिनिधी । प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे यावर्षी भाविकांसाठी महाशिवरात्री निर्मित बेलपत्रांपासून तब्बल ३० फुट उंचीचे विशाल शिवलिंग निर्मित करण्यात आले आहे.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे ओंकारेश्वर मंदिरा समोरील परिसरात तीस फुटी बेलपत्राचे शिवलिंग निर्माण केले आहे. विशाल शिवलिंगाचे दर्शनार्थ भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ओंकारेश्वर मंदिर परिसरात प्रथमच ऐतिहासिक भव्य शिवलिंगाचे निर्माण करण्यात आले आहे. भाविकांना जळगाव जिल्ह्यात प्रथमच इतके मोठया शिवलिंगाचे दर्शनाचा लाभ मिळणार आहे.
या शिवलिंगासाठी १० टन स्टील ५० पोते बेलपत्र आणि जवळपास १० ते १२ पोते फुले वापरण्यात आली आहेत. तसेच या शिवलिंगसोबत व्यसनमुक्ती प्रतिकात्मक यज्ञकुंडात व्यसनांची आहुती टाकून व्यसनमुक्त समाज घडविणारा स्टॉल, आत्म शक्ति, सर्वाच्च सत्ता, स्वर्णीम दुनिया आदि बरोबर प्रोजेक्टरद्वारे राजयोग अनुभूती अभ्यास आणि इतर स्टॉलही लावण्यात आले असून याला भाविकाचा प्रतिसाद मिळत आहे.
पहा : जळगावात उभारण्यात आलेल्या शिवलिंगाचा व्हिडीओ.