जळगाव, प्रतिनिधी । अयोध्यानगर येथील हनुमान मंदिर येथे भारतीय जनता पार्टी मंडल क्र ३ च्या व हिदुत्ववादी संघटनेच्या वतीने मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुली करा या मागणीसाठी आज घंटानाद करण्यात आले.
अयोध्यानगर येथील हनुमान मंदिर येथे घंटानादवेळी मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण कोल्हे, माहानगर जिल्हा उपअध्यक्ष माजी नगरसेवक प्रदिप रोटे, मातोश्री कंट्रक्शनचे संचालक विजय वानखेडे, प्रभाग समीती सद्स संतोष इंगळे,युवामोर्चा अध्यक्ष गौरव येवले, महानगर जिल्हा सरचिटणीस अक्षय जेजुरकर, जितेंद्र चौथे, मंडल चिटणीस योगेश निबांळकर, मंडल सरचिटणीस,किसन मराठे, धनराज पाटील, गोकुळ पाटील, राहुल पाटील, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक प्रविण कोल्हे यांनी आंदोलन प्रसंगी भक्तांसाठी देवाच्या दर्शनासाठी मंदिराचे खुली करा अन्या था तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत हे सरकार सामन्याचे नसून श्रीमंतांचे सरकार आहे असा आरोप केला. देवाच्या दर्शनाच्या आड येऊ नका अन्यथा सरकारला भोग भोगावे लागतील अशी टीका महानगर जिल्हा उपअध्यक्ष प्रदिप रोटे यांनी यावेळी केली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1337766416555106/