शेत शिवारात काम करणाऱ्या मजूरांवर मधमाशांचा हल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा शिवारात शेतात हरभरा काढणीचे काम करणाऱ्या शेतकऱ्यासह ६ शेतमजुरांवर मधमाशांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी, ५ मार्च रोजी सकाळी घडली. या हल्ल्यात शेतकरी आणि ६ शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आसोदा शिवारातील शेतात काही मजूर हरभरा काढणीचे काम सुरू होते. यावेळी अचानकपणे मधमाश्यांनी काम करणाऱ्या मजून आणि शेतकऱ्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात शेतकरी आणि ६ शेतमजूर गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन शेतमजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मधमाशांच्या हल्ल्यामुळे आसोदा शिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी आणि शेतमजूर भयभीत झाले आहेत.

Protected Content