धरणगाव प्रतिनिधी । जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला आहे. सोनवद येथील ग्रामीण रूग्णालयात २० बेड व १० ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी तालुकाध्यक्ष तथा अहिरे खुर्द ग्रा.पं.सदस्य विजय पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. दरम्यान शहरी भागातील कोरोनाची स्थिती पाहून ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शहरात कोरोना सेंटरमध्ये रूग्णांसाठी बेड कमी पडत आहे. त्यात दिवसेंदिवस अजून रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्ण शहरी भागात उपचार घेण्यास नकार देत आहे. ही परिस्थिती पाहून सोनवद उप ग्रामीण रूग्णालयात २० बेड व १० ऑक्सीजन बेडची सुविध उपलब्ध करून द्यावी जेणे करून ग्रामीण भागातील रूग्णांना वेळवर योग्य उपचार घेतील. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी तालुकाध्यक्ष तथा अहिरे खुर्द ग्रा.पं.सदस्य विजय पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.