भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील सिंधी गावामध्ये शिवीगाळ करण्याच्या कारणावरून दोन जणांना धारदार लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवार १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मुक्तार नजीर शहा (वय-३६, रा. सिंधी ता.भुसावळ) हा तरुण शुक्रवारी १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गावातील सिंधी गावातील उस्मानिया चौकात बसलेला असताना संशयित आरोपी सादिक इब्राहिम शहा रा. नंदुरबार हा दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करत होता. त्यावेळी मुक्तार याने शिवीगाळ करू नको, असे सांगितले. याचा राग आल्याने सादिक इब्राहिम शहा, इसराईल दगडू शहा, दगडू हुसेन अली शहा आणि हारून शहा हुसेनअली शहा सर्व (रा. सिंधी ता.भुसावळ) या चार जणांनी मुक्तार शहा आणि त्याचा नातेवाईक हसनशहा बुडन शहा या दोघांना लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर दुखापत केली. दरम्यान या घटनेबाबत शनिवारी १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता मुक्ता नजीर शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. सुभान तडवी करीत आहे.