जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील वैष्णिवी पॉलीमर कंपनी येथे चहा व सिगरेटचे पैसे मागितल्याच्या रागातून चहाविक्रेत्या महिलेला दोन जणांनी लोटगाडी उलटी करून नुकसान करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी पहाटे ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीतील व्ही सेक्टरमधील वैष्णिवी पॉलीमर कंपनीजवळ सारीका राजेश वसाणे वय-४० या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. चहा टपरी चालवून त्या आपला उदरनिर्वाह करतात. कंपनीच्या समोरच त्यांची चहाची टपरी आहे. बुधवारी २९ मे रोजी रात्री १२.३० वाजता महिला ही टपरीवर असतांना करण पाटील आणि चेतन माळी यांनी महिलेच्या टपरीवर येवून चहा व सिगरेट घेतली. त्यानंतर महिलेने चहा व सिगरेटचे पैसे मागितले. या कारणावरून करण पाटील आणि चेतन माळी यांनी महिलेला शिवीगाळ करत चहाची टपरी उलटी करून नुकसान केले. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी महिलेने पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार पहाटे ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणारे करण पाटील आणि चेतन माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे