जीवेठार मारण्याची धमकी देत एकाला लाकडी दांडक्याने मारहाण

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर तालुक्यातील जानवे शिवारात घडली आहे. याप्रकरणी रविवारी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, गुरूदास अर्जून पाटील वय-५२, रा. जानवे ता. अमळनेर ह.मु. मुंबई हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते मुंबई पोलीस असून तिथेच परिवारासह वास्तव्याला आहेत. शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता ते त्यांच्या शेतात ट्रॅक्टरने रोटर मारण्याचे काम करत असतांना चंद्रकांत अर्जून पाटील आणि त्याचा मुलगा कल्पेश चंद्रकांत पाटील दोन्ही रा. जानवे ता.अमळनेर या दोघांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर गुरूदास पाटील यांना शिवीगाळ करत शेतात पुन्हा आला तर तुझा मर्डरच करतो असे सांगून दम दिला. याप्रकरणी रविवारी १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार दोनजणांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content