Home क्राईम चाळीसगाव येथे तरूणाला मारहाण; चौघांवर गुन्हा

चाळीसगाव येथे तरूणाला मारहाण; चौघांवर गुन्हा


चाळीसगाव प्रतिनिधी । दुचाकीने जात असलेल्या तरूणाला थांबवून चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील जुना मालेगाव नाका येथे घडली. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

 

सविस्तर असे की, उज्वल खुशाल पाटील (वय-१९) रा. संत सेना महाराज मंदीराजवळ चाळीसगाव हा तरूणी ९ मे रोजी दुपारी २ आपल्या मित्राच्या घरी भेटण्यासाठी गेला होता. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास तो शहरातील जुना मालेगाव नाक्यावरील दुकानावर पाण्याची बाटली घेण्यासाठी दुचाकीने गेला होता. पाण्याची बाटली घेवून परत दुचाकीने मित्राकडे जात असतांना रस्त्यावर त्याला त्याचे ओळखीचे कल्पेश सुनिल पाटील रा.जुना मालेराव नाका, दिपराज पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि एक अनोळखी त्यांचा मित्र यांनी दुचाकी आडवून आमच्याकडे ताट नजरेने का पाहतोस असे म्हणून शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यातील कल्पेशने हातातील जड वस्तूने डोक्याला मरून जखमी केले. तसेच आमच्या नांदी लागशील तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. जखमी तरूणाला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तरूणाच्या फिर्यादीवरून चार जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound