शिवाजी नगरात मुलाला मारहाण; शहर पोलीसात एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या १३ वर्षीय मुलाला काहीही कारण नसतांना एकाने मारहाण केली. गुप्ता यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, सामजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता रा. शिवाजी नगर यांचा मुलगा वेद गुप्ता (वय-१३) हा गल्लीत उभा असतांना शिवाजी नगरातील राहूल जगन्नाथ कोळी याने काहीही कारण नसतांना शर्टाची कॉलर पकडून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यात नाकावर बुक्का मारल्याने नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. दिपक गुप्ता यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात राहूल कोळी यांच्या विरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. ओमप्रकाश सोनी करीत आहे.

Protected Content