पैश्यांच्या कारणावरून ज्ञानदेव नगरातील विवाहितेसह आई व मुलाला मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ज्ञानदेव नगरात पैश्यांच्या देवाणघेवाणच्या कारणावरून विवाहितेसह तिच्या आई व मुलाला चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी २३ मार्च रोजी सायंकाळी शनीपेठ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, हर्षदा राहूल टोके रा. मकरंद कॉलनी महाबळ या महिला आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. २३ मार्च रोजी हर्षदा टोके ह्या आई कोकीळा काळे रा. ज्ञानदेव नगर यांच्या घरी आल्या होत्या. राजू झोपे रा. विठ्ठल पेठ यांनी हातउसनवारीने हर्षदा टोके यांनी ४ लाख ५० हजार रूपये दिले होते. त्यापैकी ३ लाख ३० हजार राजू झोपे यांनी परत केले. उर्वरित १ लाख २० हजार रूपये हर्षदा टोके यांनी राजू झोपे कडे मागणी करत होते. दरम्यान बुधवार २३ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता हर्षदा ह्या आईच्या घरी असतांना राजू झोपे, त्याचा भाऊ किरण झोपे, त्याची पत्नी धनश्री झोपे आणि त्याची आई मंगला झोपे हे सर्व जण विवाहितेच्या घरी आले व शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. यात विवाहितेची आई कोकीळा काळे, तिचा मुलगा नैतिक राहू टोके यांनी मध्यस्थी केली असता त्यांना देखील मारहाण केली. तर राजू झोपे याने विवाहितेवर दगडफेक केली. यात विवाहिता जखमी झाल्या. याप्रकरणी विवाहितेने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी राजू झोपे, धनश्री झोपे, किरण झोपे आणि मंगला झोपे सर्व रा. विठ्ठल पेठ यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.

Protected Content