यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कासारखेडा गावात दोन गटात शाब्दीक चकमकीवरून जोरदार मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ८ जणांविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, कासारखेडा तालुका यावल येथे आज (दि.२७ एप्रिल) रोजी दुपारी १२ ते १२:१५ वाजेच्या दरम्यान कासारखेडा येथील राहणारे बाळु शांताराम पाटील (वय-३६) हे आपल्या घराजवळ असतांना चिंचोली तालुका यावल येथील विजय उर्फबंटी काशीनाथ साळुंखे व त्याच्या सोबत असलेले सहा ते सात जण हे त्यांच्याकडील मोटरसायकल घेवून जोरजोरात ओरडु लागले.
त्यावेळी बाळु शांताराम पाटील यांनी त्यांना समजवुन सांगितले की, आमच्याकडे दु:खद घटना घडली आहे. असे सांगितले असताना त्याचे वाईट वाटुन विजय उर्फ बंटी साळुंखे व त्यांच्या सोबत असलेल्या सर्वांनी त्यांना चापटा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत घरात अनधिकृतपणे प्रवेश करून आईस मारहाण केली. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कोरोना संचारबंदीचे नियम मोडुन बेकायदेशीर मंडळी जमवुन कोवीड१९चे नियम मोडले. म्हणुन बाळु शांताराम पाटील यांनी फिर्याद दिल्याने संशयीत आरोपी विजय उर्फबंटी काशीनाथ साळुंखे रा. चिंचोली यांच्यासह सोबत सात जणांविरुद्ध भादवी कलम १४३ , १४७ , ३२३ , ५०४ , ५०६ , १८८ मु . पो . अॅक्ट३७ (१ ) ( ३ ) चे १३५प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे तपास करीत आहे.