हुंड्याच्या पैशांसाठी विवाहितेला मारहाण व छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हुंड्याच्या पैशांसाठी दौलत नगरातील विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मोहाडी रोडवरील दौलत नगरातील माहेर असलेल्या भाविका रवि चेनानी (वय-३७) यांचा विवाह उल्हास नगर, ठाणे येथील रवि महेश चेनानी यांच्याशी रितीरिवाजानूसार झाला. लग्नानंतर काही दिवसांतच पती रवि चेनानी याने विवाहितेला माहेरहून हुड्यांचे पैसे आणावे यासाठी मागणी केली. दरम्यान, विवाहिते पैशांची पुर्तता न केल्याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केला. तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. बुधवारी २२ जून रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती रवि महेश चेनानी, चुलत सासरे हिरालाल चेनानी , नणंद कंगना अनिल संबवाणी, नंदोई सुनिल कटारिया सर्व रा. उल्हास नगर, ठाणे यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र पाटील करीत आहे.

 

 

Protected Content