दारूच्या नशेत एकाला मारहाण व जीवे मारण्याची धमकी

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वे स्टेशनजवळील बाबा टी सेंटर समोर दारूच्या नशेत काहीही कारण नसतांना एकाला शिवीगाळ करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सैय्यद दिलावर अली अकबर वय ४१ रा. उस्मानिया पार्क, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता सैय्यद दिलावर हे जळगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळील बाबा टी सेंटरसमोर कामाच्या निमित्ताने आलेला असतांना संशयित आरोपी मोनल रत्वेकर रा. जळगाव याने दारूच्या नशेत येवून सैय्यद दिलावर याला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढीलतपास सहाय्यक फौजदार वाहेद तडवी हे करीत आहे.

Protected Content