बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग रावेरमार्गे करणासाठी ना. रक्षाताई खडसे यांचा पुढाकार

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग रावेर मार्गे करा चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच करण्याबाबतचे आदेश पारित करावे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

राष्ट्रीय महामार्ग बर्‍हाणपूर-अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण हे मुक्ताईनगर तालुक्यातून न करता आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा येथून करणे, तसेच सदर रस्त्याचे सध्या चालू असलेले देखभाल दुरुस्ती तत्काळ सुरु करणे बाबत ठेकेदाराला आदेश करणे याबाबत आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली.

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग बर्‍हाणपूर-अंकलेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण मंजूर झाले असून जमीन संपादन बाबत नुकतेच राजपत्र काढण्यात आलेले होते. सदर रस्ता पूर्वीच्या मार्गाने न करता मुक्ताईनगर तालुक्यातील गावांमधून जाणार असल्याने रावेर तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी होती. तसेच सदर महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने रु.६१ कोटी निधी मंजूर असून ठेकेदारामार्फत दुरुस्तीचे काम संथ गतीने होत आहे व सध्या तर काम बंद आहे अश्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.

या अनुषंगाने आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सदर महामार्ग पूर्वीच्या मार्गानेच करणे तसेच सदर रस्त्याची देखभाल दुरुस्ती असलेल्या ठेकेदारास काम तत्काळ सुरु करणे नाही तर कंत्राटदार बदलविणे बाबत माननीय नितीन गडकरी यांना मागणी केली. यावर त्यांनी लवकरात लवकर कार्यवाही करणेबाबत आश्वासन दिले.

Protected Content