जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील ई-सेक्टमधील बारदान व गोणपाट गोदामाला अचानक आग लागल्याच घटना बुधवारी १ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. ही आग कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. परंतू महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन बंबाद्वारे ही आग विझविण्यात आली आहे. या आगीबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक असे की, जळगाव औद्योगिक वसाहतीतील ई-सेक्टर मधील खान्देश रोलर फ्लोअर मील कंपनी आहे. या कंपनीत जुने गोणपाट व बारदान बनविण्याचे काम केले जाते. दरम्यान, बुधवारी १ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक बारदान गोदामाला आग लागली. त्यामुळे गोदामात ठेवलेले बारदानचे गाठोड्यांनी पेट घेतला. यात संपुर्ण बारदान अर्धवट जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेचे दोन अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. ही आग कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.