फैजपूर, प्रतिनिधी | येथे मरी मातेच्या यात्रोत्सवानिमित्ताने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मंगळवारी (दि.१३) सायंकाळी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडला. दरवर्षी श्रावण महिन्यात दुसऱ्या मंगळवारी या बारागाड्या ओढल्या जातात. भगत संजय कोल्हे व त्यांचे सहकारी यांनी यावेळी बारागाड्या ओढल्या.
यावेळी भाविकांनी मरीमातेचा जयघोष केला. तत्पूर्वी दुपारी शहरातून भगत व सहकारी यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील मुन्सिपल हायस्कूलजवळून ते सुभाष चौकापर्यंत भगत संजय कोल्हे व त्यांचे सहकारी राजू मेढे, खुशाल गाजरे यांनी बारागाड्या ओढल्या, त्यानंतर मरी मातेचे दर्शन घेतले. यावेळी शहर तथा परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सपोनि प्रकाश वानखेडे, फौजदार मनिष ठाकुर, जिजाबराव पाटील, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, होमगार्ड समादेशक विकास कोल्हे, गुप्तवार्ता विभागाचे मोहन लोखंडे, यशवंत काकडे व त्यांच्या सहकार्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.