धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव ते चोपडा रोडवरील आयटीआय जवळ उभे असलेल्या ट्रक मधील चालकाला चाकूने गळा कापण्याची धमकी देत चौघांनी ट्रकमधील डीझेल टॅक मधून १२० लिटर डिझेलची चोरी केल्याची घटना गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, धरणगाव शहरातील चोपडा रोडवर असलेल्या आयटीआय जवळ शिवेंद्रसिंग अधिराम धाकर (वय-२९, रा. राणीपुरा जि.मोरेना, मध्यप्रदेश) हा त्याचा ट्रक क्रमांक ( TN-01 , AF 9830) ने आलेला होता. त्यावेळी त्याने आयटीआयजवळील रोडच्या बाजूला आपला ट्रक लावून झोपलेला होता. त्यावेळी संशयित आरोपी गुरु उर्फ प्रशांत नवनाथ देवकात, योगेश धनगर, शुभम अविनाश शेळके आणि गोपाळ (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. रामनगर,धुळे असे चार जणांनी ट्रकचालक शिवेंद्रसिंग धाकर यांच्या गळ्याला धारदार चाकू लावून गळा कापण्याची धमकी देत ट्रक चालक ट्रकच्या डिझेल टॅंक मधून १२० लिटर डिझेल जबरी चोरून नेले. हा प्रकार घडल्यानंतर ट्रकचालक शिवेंद्रसिंग धाकर याने धरणगाव पोलीस ठाण्यात गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता तक्रार दिली. धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तुपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जीभाऊ पाटील करीत आहे.