Home क्राईम बापरे… रस्त्यावर बेदम मारहाण करून तरूणाला लुटले

बापरे… रस्त्यावर बेदम मारहाण करून तरूणाला लुटले


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण मधील विद्या इंग्लिश मीडियम स्कूल जवळ तरूणाला बेदम मारहाण करून हातातील चांदीचे ब्रेसलेट, मोबाईल आणि रोकड असा एकुण १४ हजार ९५० रूपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याचा खळबळजनक प्रकार बुधवार ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घडला. याप्रकरणी चौकशी अंती अखेर शुक्रवारी ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील विद्यूत कॉलनीत राहणारा तरूण कुणाल विजय सोनार वय- २२ हा बुधवार ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मेहरूण परिसरातील विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल येथे रस्त्याच्या बाजूला उभा होता. त्यावेळी त्यांच्या जवळ चार अनोळखी तरूण आले. त्याला काहीही कारण नसतांना चौघांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यात त्यांच्या हातातील ४ हजार रूपये किंमतीचे चांदीचे ब्रेसलेट, १० हजाराचा मोबाईल आणि ९५० रूपयांची रोकड असा एकुण १४ हजार ९५० रूपयांचा ऐवज लूटून नेला. हा प्रकार घडल्यानंतर शुक्रवारी ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता तरूणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे.


Protected Content

Play sound