बापरे …. पुराच्या प्रवाहात ट्रॅक्टरसह ट्रॉलीची गेले वाहून; कामगार थोडक्यात बचावले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नागझिरी शिवारातील गिरणा नदी पात्रात अवैध वाळूचा उपसा करत असतांना अचानक मोहाडी परिसरातील जंगालातून गिरणा नदीला अचानक पाणी आल्याने ट्रॅक्टर फसला आणि पाण्याचा प्रवाह वाढताच ट्रॅक्टर ट्रॉलीसह नदी पात्रात वाहून गेल्याची घटना शनिवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधपणे वाळूचा उपसा केला जात आहे. त्यातच वाळूमाफियांनी जीवाची पर्वा न करता भरपावसात गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा सुरूच ठेवले आहे. दरम्यान, जळगाव तालुक्यातील नागझिरी शिवरातील गिरणा नदी पात्रातून देखील मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. शनिवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नागझिरी शिवरातीन गिरणा नदी पात्रातून अवैधपणे वाळू उपसा सुरू होता. त्यावेळी सात ते आठ मजूर हे गिरणा नदी पात्रात ट्रॅक्टरमध्ये वाळू टाकत असतांना अचानक गिरणा नदी पात्रात पाण्याचा लोंढा आला.

यात पाण्याची पातळी वाढल्याने मजूरांनी ट्रॅक्टर सोडून स्वत:चा बचाव केला. मोहाडी परिसरातील जंगलातून गिरणा नदी पात्रात अचानक पाणी आल्याने पाण्यासोबत वाळूचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली फसली त्यानंतर पाण्याच्या प्रवाहाने ट्रॅक्टरसह ट्रॉली पाण्यात वाहून गेली. वाळू कामगारांनी तेथून पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले आहे.

Protected Content