जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव संचलित फकिरा हरी लेवा बोर्डिंग हाऊस, जळगावच्या वतीने वसतीगृहातील मुलींसाठीच्या गणेशोत्सवाचा दिमाखात सोहळा संपन्न झाला.
आकर्षक गणेश मुर्तीसोबतच विद्यार्थिनींनी तयार केलेले चंद्रयान-3 चे डेकोरेशन मुख्यत: आकर्षणाचे केंद्र ठरले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी एस. राणे यांच्या हस्ते गणेश वंदना करून गणेशोत्सवाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, मुलींनी सुध्दा गणेशाकडून प्रेरणा घेऊन समाजात आपले उच्च स्थान निर्माण केले पाहिजे. समाजात वाढणाऱ्या कुप्रथा, रूढी यावर मात केली पाहिजे. त्यानंतर मंत्रोच्चारात गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी लेवा एज्यूकेशनल युनियन, जळगावचे प्रशासकीय अधिकारी श्री. सतीश चौधरी, बोर्डिंग हाऊसच्या रेक्टर कुमुद पाटील सोबतच समिती सदस्य प्रा. डॉ. आर. एन. बावणे, प्रा. सायली पाटील, प्रा. भारती चौधरी यांची उपस्थिती होती. गणेश उत्सव डेकोरेशनसाठी भावना धांडे, तेजल पाटील, मेघा पाटील, अंकिता लांडगे, मोनिका गायकवाड, नेहा सिसोदे, मयुरी, भूमिका, संध्या, ममता पाटील, निकिता राजपूत आदि विद्यार्थिंनीनी परिश्रम घेतले.