सलग ४ दिवस बँका राहणार बंद

 

 

नवी दिल्ली,  वृत्तसंस्था ।  देशात आजपासून सलग ४ दिवस बँका  बंद राहणार असून शनिवार १७ एप्रिल रोजी बँका उघणार आहेत.  विविध सण आणि उत्सवामुळे देशातील बॅंका सलग चार दिवस बंद राहणार आहेत.

एप्रिल महिन्यात  बँका एकूण ९  दिवस बंद राहणार आहेत. तर या आठवड्यात बँका सलग ४  दिवस बंद राहणार असून  अशा परिस्थितीत जर तुमची कामं रखडली असतील तर तुम्हाला आता चार दिवस वाट पाहण्या व्यतिरिक्त अन्य पर्याय नाही.  कोणत्या दिवशी बॅंका बंद राहणार याची यादी आरबीआयकडून प्रसिद्ध केली जाते. जाणून घ्या या महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार…

सर्व राज्यांत एकसमान नियम नाहीत

रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या यादीत एप्रिल महिन्यात एकूण १५  दिवस सुट्ट्या असणार आहेत. पण सर्व राज्यात बँकाना एकसमान सुट्ट्या नाहीत. कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकाच दिवशी साजरा केला केला जात नाही. आरबीआयच्या वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये  १५  दिवस बँका बंद राहणार आहेत.

बँकेच्या सुट्ट्यांची यादी

– १३  एप्रिल – मंगळवार – उगाडी, तेलगू नवीन वर्ष, बोहाग बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव (बेलापूर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाल, जम्मू, मुंबई, नागपूर, श्रीनगर याठिकाणी सुट्टी)

– १४  एप्रिल – बुधवार – डॉ. आंबेडकर जयंती, सम्राट अशोका जन्मदिन, तमिळ नवीन वर्ष, महा विशुबा संक्रांती, बोहाग बिहू (एजॉल, भोपाळ, चंदीगड, नवी दिल्ली, रायपूर, शिलाँग आणि शिमला या ठिकाणी बँका खुल्या राहणार)

– १५  एप्रिल – गुरुवार – हिमाचल दिन, विशु, बंगाली नवीन वर्ष, सरहुल (अगरतळा, गुवाहाटी, कोलकाता, रांची, शिमला येथे सुट्टी)

– १६  एप्रिल – शुक्रवार – बोहाग बिहू (गुवाहाटीमध्ये बँका बंद)

– १८ एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

– २१  एप्रिल – बुधवार – राम नवमी, गारिया पूजा (अगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, पाटणा, रांची आणि शिमला येथे बँका बंद)

– २४  एप्रिल – चौथा शनिवार (सर्व ठिकाणी बँका बंद)

 २५  एप्रिल – रविवार – महावीर जयंती

 

Protected Content