Home क्राईम बँक फोडण्याचा डाव फसला; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

बँक फोडण्याचा डाव फसला; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात भरवस्तीत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत शुक्रवारी ३ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजून २८ मिनीटांनी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार बॅक नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यासंदर्भात भुसावळ तालुका पोलीसात तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील भररस्त्यावर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची शाखा आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून या बँकेकडे पाहीले जाते. शुक्रवारी ३ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजून २८ मिनीटांनी अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. परंतू चोरट्यांचा चोरी करण्याचा डाव अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे त्यांना खाली हात परतावे लागले. दरम्यान, हा सर्व प्रकार बँक नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यासंदर्भात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound