नवी दिल्ली वृत्तसंथा । गेल्या आर्थिक वर्षात बँका आणि अन्य वित्त संस्थांमध्ये आर्थिक घोटाळे होण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालातून ही गोष्टी समोर आली आहे.
अशा घोटाळे होणे आणि ते बाहेर येणे यात दोन वर्षाचा कालावधी लागतो. तर १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूकीत हा वेळ अधिक जास्त असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
२०१९-२० या आर्थिक वर्षात बँका आणि वित्त संस्थांद्वारे रिपोर्ट करण्यात आलेल्या एक लाख रुपये आणि त्या पेक्षा अधिक रक्कमेच्या प्रकरणांची संख्या २८ टक्के इतकी आहे. मुल्याचा विचार केल्यास १५९ टक्के इतकी वाढ झाली.
या घोटाळ्यांच्या तारखा गेल्या काही वर्षातील आहेत. एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेची फसवणुकीचे आकडेवारी देताना आरबीआयने सांगितले की, २०१९-२० मध्ये ८ हजार ७०७ फसवणुकीची प्रकरणे समोर आलीत. त्यात १ कोटी ८५ लाख ६४४ कोटी रुपये इतक्या रक्कमेचा समावेश होता.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या काळात २८ हजार ८४३ कोटी रुपयांच्या फसवणूकीची १ हजार ५५८ प्रकरणे समोर आली आहेत. १०० कोटी पेक्षा अधिक रक्कमेची प्रकरणे सरासरी ६३ महिन्यांनी समोर आली आहेत. काही प्रकरणांची तारीख काही वर्षांपूर्वीची आहेत.