चोपडा सहकारी साखर कारखान्याची बँक खाती सील

चोपडा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकर्‍यांची देणी थकीत असल्याने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार चोसाका अर्थात चोपडा सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन बँक खाती सील करण्यात आली आहेत.

चोपडा सहकारी साखर कारखान्याकडे शेतकर्‍यांचे २०१४-१५च्या हंगामातील ऊसाचे ६०० रुपये प्रतिटन पेमेंट व्याजासह देण्याचे आदेश, उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिले होते. कारखान्यावर महसुली वसूली प्रमाणपत्र प्रमाणे कार्यवाही झालेली असताना, कारखाना सुरू रहावा या साठी ज्यांनी केस जिंकली त्यांनीच ही कारवाई थांबवण्याची विनंती तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांना केली होती.

या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तहसीलदार अनिल गावित यांनी सोमवारी कारवाई करत, चोपडा साखर कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन, कारखान्याची सर्व बँक खाती सील केली. शेतकर्‍यांची देणे रक्कम २३ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. यासोबत येणी असलेली रक्कम १३.१३ कोटी रुपये न दिल्यास ती मालमत्ता पुढील आदेश येईपर्यंत ताब्यात राहणार आहे. दरम्यान तहसीलदारांनी सील केलेल्या खात्यातील पैसा हा शेतकर्‍यांसाठी वापरण्यात येणार आहे. यापुर्वीही तत्कालीन तहसीलदार दीपक गिरासे यांच्या काळात साखर विकून शेतकर्‍यांचे पैसे दिले होते. सध्या चोसाका बारामती ऍग्रो या कंपनीला भाडेतत्त्वावर दिला आहे.

Protected Content