Home क्राईम मराठीत बोल सांगितल्याने बांगलादेशी कुरियर बॉयकडून तरुणींना मारहाण

मराठीत बोल सांगितल्याने बांगलादेशी कुरियर बॉयकडून तरुणींना मारहाण


मुंबई (वृत्तसंस्था) कुरियर घेऊन आलेल्या तरुणाला मराठीत बोल असे सांगितल्यावर त्याने दोन महिलांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. शिवाजी पार्क पोलिस ठाणे आणि शिवसेना भवनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुरुकृपा इमारतीत ही घटना घडली.
या इमारतीमध्ये सुजिता पेडणेकर आणि विनीता पेडणेकर या दोघी राहतात. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुरियर घेऊन आलेल्या कुरियर बॉयला या युवतींनी मराठीत बोलण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने या तरुणाने शिवीगाळ करत एका युवतीच्या चेहऱ्यावर पेनाने वार केला तर, दुसरीच्या डोक्यावर ठोसा लगावला. या तरुणींनी स्थानिकांच्या मदतीने आरोपी तरुणास पकडून शिवाजी पार्क पोलिसांच्या हवाली केले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असून आरोपी हा बांगलादेशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound