जळगाव प्रतिनिधी । पान विडा न आवडणारा व्यक्ती विरळाच…पण आजवर पान टपरी वा शॉपवर जाऊन विकत घेण्यासाठी कुणी महिला धजावत नव्हती. कारण हा सर्व पुरूषी प्रांत ओळखला जातो. तथापि, जळगावातील बनारसी पान कॅफे या दुकानात मात्र कुटुंबातील कुणीही व्यक्ती सहजपणे जाऊन पान विड्यासह विविध प्रकारचे शेक्स आणि थंड पेयांचा आस्वाद घेऊ शकतो.
पान विडा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाला पान आवडते. किंबहुना पानाचा विडा हा आपल्या संस्कृतीतील महत्वाचा घटक आहे. खरं तर, आपल्याला गल्लोगल्ली पान टपर्या दिसतात. मात्र कोणत्या पान टपरीवर जाऊन महिला वा बालके पान खाऊ शकत नाहीत. अगदी कुटुंबातील कोणताही व्यक्ती सहजपणे पान शॉपवर जाऊन विड्याचा आनंद घेऊ शकेल असा पर्याय आजवर उपलब्ध नव्हता. तथापि, जळगाव येथील बनारसी पान कॅफे या दुकानात मात्र ही सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. हे फॅमिली पान शॉप असून अर्थात, येथे महिलांसह बालके आणि कोणत्याही वयोगटातील लोक पान विड्याच्या विविध प्रकारांचा आनंद घेऊ शकतात. येथे कुणीही आपल्याला हव्या असणार्या पानाचा आस्वाद घेऊ शकतो. येथे एक-दोन नव्हे तर तब्बल ५० प्रकारचे पान मिळतात.
…आणि हो….फक्त पान विडाच नव्हे तर मुखशुध्दीसाठी वापरले जाणारे विविध पदार्थ, मुखवास, पान मसाला आदी विविध प्रॉडक्टही येथे उपलब्ध आहेत. याच्या जोडीला मोजिटो, विविध शेक्स, कुल्फी, आईस्क्रीम आदींचा आस्वादही येथे घेता येणार आहे. या शॉपमध्ये स्वच्छता, सुरक्षा आणि स्वादाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. यामुळे कुणीही सहजपणे याचा आनंद घेऊ शकतो. या संदर्भात बनारसी पान शॉपचे संचालक राकेश मंधान यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, कुणीही अगदी सहजपणे पानाचा आस्वाद घेऊ शकेल या हेतूने बनारसी पान शॉप सुरू करण्यात आलेले आहे. आमच्याकडे अतिशय प्रशस्त आणि सुरक्षीत जागा असून येथील वातावरण प्रसन्न आहे. देशभरात विख्यात असणार्या बनारसी पान शॉपचे दर्जेदार पान येथे मिळतात. अतिशय उत्तम गुणवत्तेमुळे येथील विविध पान विडे हे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. यातील चॉकलेट पानला बच्चे कंपनीची विशेष पसंती मिळाली आहे. याशिवाय, येथे मुखशुध्दीसाठी वापरले जाणारे विविध प्रॉडक्टदेखील उपलब्ध करण्यात आलेले आहेत. काळी मिरची कँडी, मँगो, इमली आदींसह अनेक पर्यायांमध्ये येथे विविध मुखवास उपलब्ध केलेले आहेत.
बनारसी पान शॉपच्या परिसरात कोणतेही तंबाकूजन्य पदार्थ विकले जात नाहीत. हा धुम्रपानमुक्त झोन आहे. यामुळे कुणीही येथे अतिशय उत्तम वातावरणात पान आणि मुखवासचा आनंद घेऊ शकतो. आचार्य काँम्पलेक्समधील शॉप क्र ११ मध्ये बनारसी पान शॉप असून येथील सेवेचा जळगावकरांनी आनंद घेण्याचे आवाहन राकेश मंधान यांनी केले आहे.
पहा : बनारसी पान कॅफेबाबतचा हा व्हिडीओ वृत्तांत.