बोदवड, प्रतिनिधी | येथील मुस्लिम समाजातर्फे “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे, दिल्लीत झालेल्या संत संमेलनात “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” नावाचे पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील भाजप नेत्यांच्या उपस्थित नुकतेच करण्यात आले. भाजपचे नेते जय भगवान गोएल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू असलेले व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बरोबर पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची तुलना केल्याने भाजपचे नेते जय भगवान गोएल यांच्यावर कडक करवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गोयल यांच्या कृत्यामुळे भारतातील सर्व शिव छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या बांधवांच्या भावना दूखल्या गेल्या आहेत. याचा मुस्लिम समाज बांधव यांचा तिव्र निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या पुस्तकाचे लेखक भगवान गोयल यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी व पुस्तकांचे प्रकाशन त्वरित थांबावे असे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नईम खान, अय्युब कुरेशी, कलिम शेख, रोहीत पोल, नितीन पाटील, शेख अफ्रीदी, समीर पिंजारी, शकील शेख ,जिया शेख आदि उपस्थित होते.