Home Cities जळगाव ‘खालीद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला; हिंदू संघटनांचे निवेदन

‘खालीद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला; हिंदू संघटनांचे निवेदन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘खालीद का शिवाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात खोटी आणि तथ्यहीन माहिती देऊन समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत, या चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

यावेळी दोन्ही संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबद्दल कोणत्याही चित्रपटात चुकीची माहिती दाखवणे हे अक्षम्य आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

चित्रपटामुळे समाजात गैरसमज निर्माण होऊन जातीय सलोख्याला बाधा येऊ शकते, अशी भीतीही संघटनांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, जनभावनांचा आदर करत ‘खालीद का शिवाजी’ या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound