यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील बामणोद ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली आहे.
महसुल सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील बामणोद ग्राम पंचायतचे ग्रामपंचायत सदस्य सरोदे हे शासकीय सेवेत नोकरी लागल्याने त्यांनी आपल्या ग्रा.पं.सदस्यपदाचा राजीनामा दिली होता. या प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकुण एक हजार ३१ असुन यात पुरुष मतदार संख्या ५६५ असुन महीला मतदार ४६६ आहे. बामणोद ग्रा.पं.च्या या प्रभागातील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत प्रमोद सरोदे हे मागील 5 महीन्यापुर्वी महसुल विभागात कोतवाल म्हणुन नोकरीस लागल्याने त्यांना आपल्या सदस्यपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या रिक्त झालेल्या सदस्यापदाच्या जागेसाठी २३ जुन रोजी मतदान होणार असुन, या पोटनिवडणुकसाठी पुरुषोत्तम प्रकाश भोळे व वैभव रमेश येवले या दोन जणांनी आपले उमेदवारी दाखल केली आहे.
यावल येथील तहसील कार्यालयाच्या दालनात निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम आज सकाळी ११ वाजता निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार नव्याने रुजु झालेले करमणुक कर निरीक्षक राजेश भंगाळे, फैजपुरचे मंडळधिकारी जे.डी. बंगाळे, यावलचे नवे मंडळधिकारी शेखर तडवी, हिंगोणा तलाठी दिपक गवई, तलाठी एन.जे. बोंडे आणि निवडणुकीचे निर्णय अधिकारी बी.एम.पवार यांच्या उपस्थितीत ईव्हीएम यंत्रणा सील करण्यात आली. २३ जुन रोजी होणाऱ्या या पोटनिवडणुकीची मतमोजणी यावल येथे तहसीलमध्ये २४ जुन रोजी होणार आहे.