जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवतीर्थ मैदानावर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने मॅटवरील तीन दिवसीय भव्य कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या वेळी शिवसेना संपर्क प्रमुख सुरेश सावंत, माजी आमदार आर. ओ. पाटील, गुलाबराव वाघ, नितीन लढ्ढा, शरद तायडे, सुनील महाजन, विष्णू भंगाळे, नितीन बरडे, अमर जैन, भागचंद जैन, अजय पाटील, शोभा चौधरी महानंदा पाटील, सरिता माळी, यास्मिन बी, ज्योती तायडे, समाधान पाटील, जळकेकर महाराज, किशोर भोसले मानसिंग सोनवणे आदी उपस्थित होते. सुनंदा चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत सुरळकर यांनी आभार मानले.
पहिला सामना क्रीडा रसिक आणि महाबली क्रीडा भुसावळ यांच्यात झाला. दुसरा सामना पांडव क्रीडा मंडळ, कासोदा आणि एकलव्य क्रीडा मंडळ यांच्यात खेळविण्यात आला. यात क्रीडा रसिकने विजय मिळविला. दुसर्या सामन्यात एकलव्य संघाने पांडव संघाला चुरशीची मात देत ३५-३१ या फरकाने हरवले. पहिल्या सामन्यात सामनाधिकारी म्हणून अलेक्झांडर मणी, तर पंच म्हणून सी. जी. पवार, श्रीकांत चतुर हे होते. दुसर्या सामन्यात सामनाधिकारी प्रदीप महाजन, पंच म्हणून नयन सागर मणी व योगेश बारी यांनी काम पाहिले. यानंतरच्या सामन्यात छत्रपती संघाने (एरंडोल) आसोदा संघाला २६-४८ या फरकाने पराभूत केले. चौथ्या सामन्यात क्रीडा प्रबोधनी संघाने मुक्ताई संघाला २७-४७ या फरकाने पराभूत केले. पाचव्या सामन्यात महर्षी वाल्मीक संघाने जय मातृभूमी संघाने ३६-३० या फरकाने, सहाव्या सामन्यात सतेज क्रीडा मंडळ (भुसावळ) संघाने ओम साई मंडळ (विखरण) संघाला ४०-३३ फरकाने हरवले. सातवा सामना महार्षि वाल्मिकी व जय मातृभूमी या संघात झाला. यात महर्षि वाल्मिकी जिकंले, आठव्या सामना नेताजी सुभाष मंडळ व पाडव क्रीडा मंडळ यांच्यात झाला. यात नेताजी सुभाष मंडळ जिकंले.