बाळाला जन्म देताच आईचा उपचारादरम्यान मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । बाळाला जन्म दिल्यानंतर हृदयाचे ठोके बंद पडल्यामूळे शिरसोली प्र.बो. येथील 28 वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती गजानन फुसे (वय 28) रा. शिरसोली या गर्भवती महिलेला पोटात दुखायला लागल्याने तिला तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. आज सकाळी त्यांनी सुखरूप मुलीला जन्म दिला. त्यानंतर विवाहितेच्या प्रकृती अधिक खालावल्याने मृत्यू झाला. दरम्यान जन्मलेल्या बाळाची प्रकृती चांगली असून त्या बाळाला जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content