मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भोंग्या’वरून राज्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्वीट करीत पत्राद्वारे निशाणा साधला होता. असे असतानाच आज मनसेच्या बाळा नांदगावकरांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच त्यांच्या पत्रातून, भोंग्यांविरोधात मनसेने केलेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी अनेक मनसे कार्यकर्त्यांची धरपकड करत कारवाई केली. राज्य सरकारकडून मनसे कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. ही कारवाई थांबवण्यासाठी बाळा नांदगावकरांनी गृहमंत्र्यांसोबत चर्चा केली असल्याची चर्चा केली जात आहे. परंतु मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना मुस्लीम संघटनांकडून मनसे नेत्यांना येणाऱ्या धमक्यांच्या संदर्भात घेण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.