Home Cities एरंडोल नंदखुर्दे येथे विज कोसळल्याने बैलाचा मृत्यू

नंदखुर्दे येथे विज कोसळल्याने बैलाचा मृत्यू

kasoda 1
kasoda 1

kasoda 1

कासोदा प्रतिनिधी । येथुन जवळच असलेल्या नंदखुर्दे येथे आज झालेल्या अवकाळी पावसा दरम्यान झाडावर वीज कोसळून एक बैल मृत्युमुखी झाला आहे. या घटनेबाबत पंचनामा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदखुर्दे शिवारात येथील शेतकरी गुलाब ताराचंद पाटील हे शेतात निंबाच्या झाडा खाली नेहमीप्रमाणे बैलजोडी बांधलेली होती. आज दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. बैलांना चारा टाकून दोन शेतकरी झाडाच्या बाजूला काही अंतरावर उभी होती. अवकाळी व वादळी पावसामुळे निंबाच्या झाडावर विज कोसळली. गुलाब पाटील यांचा 40 हजार किमतीच्या एका बैलाचा जागी मृत्यू झाला. मात्र एक बैल आणि इतर दोन शेतकरी बचावले आहे. गावातील शेतकरी वाचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान बैलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी घटनेचा पोलीसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. घटनास्थळी गावांतील नागरीकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound