जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात स्वच्छतेच्या संदेशाच्या भित्तीपत्रकाचे विमोचन विद्यापीठातील स्वच्छता सेवा पुरविणाज्या कंत्राटदाराकडील स्वच्छता कर्मचाऱ्याकडून करण्यात आले.
एम.ए. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातील ऑडीट कोर्स या पेपर अंतर्गत क्लिनलीनेस या विषयासाठी हे भित्तीपत्रक विद्याथ्र्यांकडून तयार करण्यात आले आहे. याप्रसंगी स्वच्छता सेवा कंपनीचे कर्मचारी प्रशांत पवार यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगून स्वच्छता कशा प्रकारे केली पाहिजे, घनकचज्यांचे नियोजन केले पाहिजे असे सांगितले. अध्यक्षस्थानी बोलतांनाभाषा प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे यांनी स्वच्छता माणसाला निरोगी ठेवून कार्यप्रवण करते. संत गाडगे महाराजांच्या स्वच्छता विषयक कार्याची दखल घेऊन केवळ शरीराची नाही तर मनाची स्वच्छता आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी हिंदी विभागप्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी, डॉ.आशुतोष पाटील, प्रा.दीपक खरात, प्रा. कृष्णा संदानशिव, प्रा.प्रिती सोनी, प्रमेाद शेटटी, पंकज खौरे, चुनीलाल सुर्यवंशी, प्रशांत पाटील, नेत्रा उपाध्ये, मनिषा महाजन, पुजा निचोळे व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मुक्ता महाजन यांनी तर सुत्रसंचालन प्रा.सुनील अहिरे यांनी केले.