जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील एम.ए./ एम.एस्सी. भुगोल या विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिंनीस “कै. प्रा.डॉ.विजय बाबुराव पवार सुर्वण पदक“ प्रदान करण्यासाठी दोन लाखाचा धनादेश देण्यात आला.
यावेळीहा धनादेश प्रा.डॉ.सुमित्रा विजय पवार, डॉ.सुदर्शन विजय पवार, माजी प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर शिवाजी सुर्यवंशी व सौ.भाग्यश्री दिनेश पाटील यांनी दोन लाख रुपयांचा धनादेश प्र-कुलगुरू प्रा.पी.पी. माहुलीकर यांच्याकडे सुपूर्द केला. कै. प्रा.डॉ.विजय बाबुराव पवार प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे कनिष्ठ विभागात भूगोलशास्त्र विषयाचे शिक्षक होते. डॉ. विजय पवार यांची गणना आरोग्य भूगेाल शास्त्रात संशोधन करणाऱ्या भारतातील मोजक्याच आणि महाराष्ट्रातील एकमेव संशोधक म्हणून केली जाते. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य् दिलीप रामू पाटील, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ.विवेक काटदरे, प्रभारी कुलसचिव, प्रा.बी.व्ही. पवार उपस्थित होते.