पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बहादरपूर येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मोरे कुटुंबियांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. गावातील बचत गटामार्फत आर्थिक मदत व संसारोपयोगी वस्तू देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की , तालुक्यातील बहादरपूर येथील विजय मोरे यांच्या विजेच्या शॉर्टसर्किटमुळे 7 ऑक्टोबर रोजी लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. त्यांच्यावरच दुःखाच्या प्रसंग वळवल्यामुळे बहादरपूर गावातील संसद बचतगट यांनी संसार उपयोगी भांडी घेऊन त्यांना एक मदतीचा हात दिला. होत्याचे नव्हते झाले सर्वच जळून खाक झाल्यामुळे मोठ्या हिमतीने विजुभाऊ आपल्या आईला धीर देत आपल्या संसाराचा गाडा ओडण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच मदतीचा ओघ सुरू झाला असून काल बहादरपूर चे माजी उपसरपंच संगीता माकडे आणि त्यांचे पती श्रीकांत माकडे सामाजिक कार्यकर्ते तसेच बहादरपूर चे पोलीस पाटील ज्योती चौधरी यांनी संसार सुरू करण्यासाठी सुद्धा आणि चालू जेवणाची सोय व्हावी. मनू पैशांची मदत केली अशीच मदत सुरू होऊन संसार उभारावा शेती विकून पैसा वाया गेला नीतीने घात केला असे विजय मोरे यांनी आज दैनिक पुण्यनगरी शी बोलताना सांगितले मदती वरच मी आता जीवन आणि संसार उभा करू शकू यासाठी मदतीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी निलेश चौधरी, प्रवीण माकडे, श्रीकांत वानी, संजय मुसळे, निंबा गुरव, धनराज पाटील, अमोल उपासणी, केदारनाथ काळे, उमेश वैद्य, प्रदीप माकडे, सुमोल उपासनी, प्रदीप चौधरी, नंदू टेलर, चौधरी टेलर, विशाल अमृतकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.