जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधित मागासवर्गीय कुटुंबांना विशेष बाब म्हणून संपादित घराच्या किंमतीऐवढी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीत राज्यातील अनेक महत्वपूर्ण गोष्टींचे निर्णय घेण्यात आले. त्यात प्रामुख्याने जळगावमधील रावेर तालुक्यातील निंभोरासिम येथील हतनूर बांधतांना अनेक मागासवर्गीय कुटुंबांची घरं धरणात गेली होती. या लोकांना आता विशेष बाब म्हणून संपादित घराच्या किंमतीऐवढी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. या सोबत राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.