फैजपूर प्रतिनिधी । येथील ‘मसाका’ अर्थात मधुकर सहकारी साखर कारखान्याने ऊसतोड मजूर व वाहतूक ठेकेदार यांचे पगार थकीत केल्यामुळे सर्व ठेकेदारांनी एकत्र येवून दि.13 नोव्हेंबरपासून सुरू असलेले उपोषण आज मागे घेतले आहे. सुरेश पाटील यांनी उपोषणार्थी यांचेशी चर्चा करुन थकीत पेमेंट भविष्यात उपलब्ध झालेस त्वरीत अदा करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
‘मसाका’ने ऊसतोड मजूर व वाहतूक ठेकेदारांची सुमारे ९ कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे. थकीत रक्कम मिळावी, यासाठी ऊसतोड मजूर व वाहतूक ठेकेदारांनी एकत्र येत दि.13 पासून कारखान्यासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र आज ऊसतोडणी व वाहतूक उपसमिती चेअरमन सुरेश पाटील यांनी उपोषणार्थींशी थकीत पेमेंट उपलब्ध झाल्यास त्वरीत अदा करण्यात येईल, आणि यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. त्यावर उपोषणार्थींनी देखील सकारात्मक भुमिका घेतल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले आहे.
यावेळी चेअरमन शरद महाजन, व्हा चेअरमन भागवत पाटील, संचालक नरेंद्र नारखेडे, रमेश महाजन, कार्यकारी संचालक एस.आर पिसाळ, के.डी.भंगाळे, मुख्य शेती अधिकारी तसेच उपोषणार्थी सुरेश कोळंबे, चोलदास पाटील व इतर सर्व ठेकेदार यावेळी उपस्थित होते.