भुसावळ (प्रतिनिधी) यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यासाठी आज येथे एक सर्वपक्षीय जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी बाळा डिगंबर सोनवणे यांची तर गिरीश देविदास तायडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या बैठकीत जयंती उत्सव धुमधडाक्यात आणि निर्व्यसनीपणाने साजरा करणे, वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे, संविधानाशी संबंधित देखावे आणि एकता, बंधुभाव व मैत्री दर्शविणारे सजीव देखावे सादर करणे, तसेच रक्तदान करणे, फळे व मिठाई वाटप करणे, पाणपोई सुरु करणे, अन्नदान करणे, आरोग्य शिबीरे घेणे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे अशाप्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याप्रसंगी समितीच्या अध्यक्षपदी बाबा डिगंबर सोनवणे तर उपाध्यक्षपदी गिरीश देवीदास तायडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
या बैठकीनंतर नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांसह उपस्थितांनी टू-व्हीलर रॅलीद्वारे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व गैबनशाहबाबा दर्गा येथे जाऊन त्यांना अभिवादन केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नमन करण्यात आले. या बैठकीला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.