खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मु. जे. महाविद्यालयाने तरूणांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणाच्या दृष्टीने शंभर टक्के नोकरीची संधी देणारे कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत.
भारतासारख्या मुबलक मनुष्यबळ असलेल्या शेतीप्रधान विकसनशील देशात आज शेतकर्यांची दुरवस्था झालेली बघण्यास मिळते. आज शेतकरी राजा जर जगला तरच उद्या आपणास अन्न मिळेल; अथवा वाढती महागाई आपल्याला पिळवटून टाकेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पाण्याचे सुयोग्य नियोजन करून आपण शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने महाविद्यालयामध्ये कृषी आधारित कौशल्य विकास करणारे बी.व्होक. मधील तीन पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले आहेत.
१. बी.व्होक. इन ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी
२. बी.व्होक. इन अॅग्रिकल्चर
३. बी. व्होक. इन फ्लोरिकल्चर अँड लँडस्केप गार्डनींग
अशा प्रकारची बी. व्होक. पदवी घेतल्यास विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होईल तसेच बी. व्होक. हा अभ्यासक्रम प्रात्यक्षिक व ट्रेनिंग वर आधारित असल्याने तरूणांना स्वयंरोजगार व नोकरीच्या संधी मिळण्यास ज्ञान प्राप्त होईल. यामुळे नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधाराने शेती विकसित केल्यास शेतीतील अनिश्चितता आणि निसर्गावरचे अवलंबन संपेल व शेतीचा नक्कीच करियर म्हणून विचार केला जाईल. शेतीसोबतच शेतीपूरक धंद्याचा सुद्धा विचार करणे क्रमप्राप्त ठरू शकते.
पारंपारिक पद्धतीने शेती व्यवसाय करण्याऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पन्नात भरघोस वाढ होईल व शेती हा सुद्धा एक चांगला व्यवसाय म्हणून स्वीकारता येईल. हे कौशल्याधारित शिक्षण १२ वी नंतर कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना बी.व्होक. पदवीपर्यंत घेता येते. याचबरोबर एक वर्षानंतर डिप्लोमा, दोन वर्षानंतर प्रगत डिप्लोमा आणि तीन वर्षानंतर बी.व्होक. ही डिग्री मिळते.
संबंधीत अभ्याससक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ग्रीनहाऊस टेक्निशियन, ग्रीनहाऊस फीटर, ग्रीनहाऊस ऑपरेटर, ग्रीनहाऊस सुपरवायझर, ग्रीनहाऊस मॅनेजर,क्वालिटी सीड उत्पादक, सेंद्रिय उत्पादक, मायक्रो इरिगेशन टेक्निशियन, फुलशेती तंत्रज्ञ, इत्यादी सारख्या रोजगाराच्या संधी भारतात तसेच परदेशात उपलब्ध आहेत.
वरीलप्रमाणे नोकरीच्या संधी लक्षात घेऊन महाविद्यालयाने विविध हरितगृह चालक तसेच वीज उत्पादकांसोबत शैक्षणिक करार केलेले आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत विविध कंपन्यांमध्ये तसेच हरितगृहांमध्ये / प्रशिक्षणासाठी निवड करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक कौशल्य प्राप्त करण्याच्या हेतूने मदत केली जाते; तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात.
शेतकर्यांच्या मुलामुलींसाठी स्वतःच्या पायावर उभे राहून शिक्षण घेण्याची संधी आता उपलब्ध आहे. प्रगत तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करून आपण समाजात आपले वेगळे स्थान प्राप्त करून घेऊ शकतो तसेच स्वयंरोजगार व नोकरीच्या दृष्टीने कौशल्य शिक्षणामुळे आपली प्रगती होणास मदत होईल तेव्हा आजच भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा.
:- स्वाती संवत्सर
विभागप्रमुख, जलश्री