जळगावात शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला मान्यता

जळगाव प्रतिनिधी । वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनी जळगावात शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयास मान्यता मिळाली आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.गिरीशभाऊ महाजन हे प्रयत्नशील होते. दोन वर्षांपूर्वी त्यास मान्यता मिळून प्रवेश देखील झाले होते. त्यानंतर, पुन्हा त्या ठिकाणी आयुर्वेदीक महाविद्यालय सुरु करण्यास सोमवारी मान्यता मिळाली आहे. अर्थात, मुख्यमंत्री ना.देवेंद्र फ़डणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावकरांना अनोखी भेट मिळाली असून १०० विद्यार्थ्यांना बीएएमएसच्या वर्गात प्रवेश मिळणाार आहे.

ना.गिरीषभाऊ महाजनांनी जिल्ह्यातील लोकांना दर्जेदार रुग्णसेवा मिळावी याकरिता मेडिकल हब हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला. यात ११ महिन्यात १०० प्रवेशाच्या एमबीबीएसला मान्यता मिळाली. याच एमबीबीएसची प्रवेश क्षमता वाढवून १५० करण्यात आली. तसेच चिंचोली शिवारात १३५ एकरात भव्य वास्तुची तयारी सुरु आहे. अशातच आता आयुर्वेदिक कॉलेजला मान्यता मिळाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

Protected Content