अयोध्याप्रकरणी सुनावणी पूर्ण : 17 नोव्हेंबरला निर्णय

SupremeCourtofIndia

नवी दिल्ली प्रतिनिधी । गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अयोध्यामधील रामजन्मभूमी-बाबरी वादाप्रकरणीची सुनावणी आज (दि.16) अखेर पूर्ण झाली. या प्रकरणी न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी 23 दिवसांनी म्हणजेच 17 नोव्हेंबरला निर्णय होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आज तासभर आधीच सुप्रीम कोर्टात या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आली.

सुप्रीम कोर्टात आज अयोध्याप्रकरणी सुनावणी पूर्ण करण्यात आली. कोर्टाने यासंबंधीचा निकाल राखून ठेवला असून २३ दिवसानंतर यावर फैसला सुनावण्यात येणार आहे. आज तासभर आधीच या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आली. सुप्रीम कोर्टात बुधवारी राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणावर लागोपाठ ४० दिवस सुनावणी पूर्ण करण्यात आली. पाच सदस्यीय संविधानिक खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी पूर्ण केली. आज सुनावणी सुरू होताच मुख्य न्यायाधीश (सीजेआय) यांनी स्पष्ट केले की आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत या प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु, ही सुनावणी वेळेच्या तासभर आधीच पूर्ण करण्यात आली. आजच्या सुनावणीत मुस्लीम आणि हिंदू पक्षकाराने आपापली बाजू सुप्रीम कोर्टासमोर मांडली. आज सुनावणीदरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी हिंदू महासभेच्या वकिलाकडून सादर करण्यात आलेला नकाशा फाडून टाकला. याआधी मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्व पक्षकारांना १६ ऑक्टोबर पर्यंत यासंबंधीचे पुरावे सादर करण्याचे निर्देश मुख्य न्यायाधीशांनी दिले होते. याप्रकरणावर फैसला सुनावण्यासाठी चार आठवड्याचा कालावधी लागणार असल्याने न्यायाधीशांनी पक्षकारांना पुरावे सादर करण्यास सांगितले होते.

मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वकिलाच्या युक्तीवादावर नाराजी व्यक्ती केली. जर याप्रकरणी असाच वाद सुरू राहिल्यास आम्ही उठून जाऊ, असे त्यांनी म्हटले. मुख्य न्यायाधीशांच्या नाराजीनंतर हिंदू महासभेच्या वकिलाने दिलगिरी व्यक्त करीत मी कोर्टाचा सन्मान करतो. मी न्यायालयाच्या शिष्टाचाराचे उल्लंघन केले नाही, असे म्हटले. त्यानंतर ऑक्सफोर्डमधील एका पुस्तकाचा संदर्भ दिला. मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी हा नकाशा फाडून टाकला. वकिलाच्या या कृतीवर मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Protected Content