यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेमुळे आम्हाला मोकाट भटक्या कुत्र्यांवर कारवाई करता येणार नाही असे एका तक्रार करणाऱ्या कार्यक्रर्त्याशी बोलतांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडले अकलेचे तारे या प्रकारामुळे तक्रार करणारे व्यक्ती यांची अवस्था हसु का रडू अशी झाली, यावेळी त्यांनी त्या कर्मचाऱ्यास चांगलेच सुनावले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की यावल शहरात नगरपालिकेच्या हद्दीत काल सकाळच्या वेळी वाणी गल्ली परिसरातुन दोन लहान शाळकरी विद्यार्थी मुलगी ही रस्त्याने जात असतांना त्या परिसरात असलेले सुमारे दहा ते बारा मोकाट कुत्र्यांनी त्या लहान मुलगीला एकटी असल्याचे पाहुन त्या भटक्या कुत्र्यांनी घेरल्याने त्या मुलीची अवस्था शिकारात फसल्यासारखी झाल्याने घाबरलेल्या अवस्थेत जोरजोरात ओरडून रडू लागली. यावेळी या गल्लीत राहणारे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे यांनी प्रसंगी तात्काळ धाव घेतले व त्या मुलीला कुत्र्यांपासुन वाचविले. त्यानंतर त्यांनी यावल नगरपालिकेत जावुन संबधीत विभागाकडे शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी तक्रार त्यांनी केली असता त्या हजर कर्मचाऱ्याने सांगीतले की दादा आता सर्वत्र निवडणुकीची आचार सहींता लावण्यात आली असल्याकारणाने आम्हाला अशा प्रकारे शहरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांवर कारवाई करता येणार नाही, यावेळी निलेश गडे यांनी त्या कर्मचाऱ्यानी दिलेले उत्तर ऐकुन आश्चर्याचा धक्काच बसला. यावेळी त्यांची अवस्था हसवे किरडावे अशी झाली, त्यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यास चांगलेच धारेवर घेत खडसावुन सांगीतले की, मोकाट कुत्र्यांवर कारवाईशी निवडणुक आचार संहितेशी काय संबंध असे सांगीतले. नगरपालिकेत सध्याच्या परिस्थितीला कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे.
यावल शहरातील नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विस्तारीत वसाहतीमध्ये देखील मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी हैदोस घातले आहे. दुचाकी वाहनधारकांमध्ये भिती पसरली आहे. यावल नगरपालिकेने तात्काळ या धोकादायक असणारे मोकाट कुत्र्यांचे स्पेयींग आणी निर्मुलन करणे व श्वान अभयारण्य आणी आश्रयस्थानामध्ये अशा प्रकारे भटकणाऱ्या कुत्र्यांचे पुनवर्सन करावे अशी मागणी देखील डॉ. निलेश गडे यांनी केली आहे.