फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत शहरातील इतर शाळांमधील विद्यार्थी जागरूकता रॅली आयोजित करत असून विविध ठिकाणी स्वच्छतेबाबत पथनाट्य सादर करीत आहेत.
फैजपूर पालिकेतर्फे शासनाच्या हागणदारीमुक्त मोहीमतंर्गत सन २०१६ साली शहरात वैयक्तिक शौचालय योजना राबविण्यात आली. त्यात शासनाने सन २०११च्या जनगणनेनुसार वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्टे पालिकेने शासना दिलेल्या मुदतीत वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्टे पूर्ती केल्याने पालिकेने नाशिक विभागात प्रथम क्रमांकांचा मान मिळविला. याच पार्श्वभूमीवर स्वच्छ सर्व्हेक्षण २०२०सुरू असल्याने या स्पर्धेत फैजपूर पालिकेने सहभाग घेतलेला आहे.
पालिकेला यश
या स्पर्धेत ओडीएफ + दर्जा प्राप्त करण्यात पालिकेला यश मिळाले आहे. तर स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)अंतर्गत तीन स्टार रेटिंग नामांकन मिळण्यासाठी पालिकेने कंबर कसलीय. यश मिळण्यासाठी स्वच्छ सर्व्हेक्षण २०२० सुरू असल्याने या स्पर्धेत फैजपूर पालिकेने सहभाग घेतलेला आहे. त्यासाठी शहरात नियमित साफसफाईसह शहरातील, शाळा, महाविद्यालये, हॉटेल, हॉस्पिटल, सरकारी कार्यालये यासह शहरात नियमित साफसफाई स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे.
जनजागृती रॅली
दि ३ डिसेंबर रोजी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अभियंता विपुल साळुंखे, शहर समनव्ययिका अश्विनी खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पालिकेकडून म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता जनजागृती रॅली शहरात काढण्यात आली होती.
शहरातील या ठिकाणी
यावेळी बसस्थानक, गावातील राममंदिर, सुभाष चौक याठिकाणी शहर स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर करून स्वच्छतेचा संदेश दिला. यापुढेही पालिकेकडून शहरात पथनाट्य, जनजागृती रॅली, भिंतीपत्रक या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. फैजपूर शहर स्वच्छ शहर व सुंदर शहर ही संकल्पना म्हणून शहरात नियमित साफसफाई व स्वच्छतेवर पालिकेने भर देऊन स्वच्छ सर्व्हेक्षण २०२० या स्पर्धेत नामांकन मिळविण्याचा ध्यास धरला आहे.