Home Cities जळगाव श्रीराम मंदीर निधी संकलनासाठी शिवकॉलनी परिसरात जनजागृती रॅली व दिपोत्सव

श्रीराम मंदीर निधी संकलनासाठी शिवकॉलनी परिसरात जनजागृती रॅली व दिपोत्सव

0
35

जळगाव प्रतिनिधी । स्वामी विवेकानंद नगर शिवकॉलनी येथील श्रीराम निधी संकलन समितीच्या वतीने आज संपुर्ण शिवकॉलनीतील परिसरातून रॅली काढून दिपोत्सव साजरा करण्यात आला. 

प्रभू श्रीराम मंदीर निधी संकलनाच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतला असून शहरातील ठिकठिकाणी निधी संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने आज शिवकॉलनी परिसरातील श्रीराम निधी संकलनासाठी स्वामी विवेकानंद वासियांनी आज १३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता शिवकॉलनी थांब्यापासून भव्य रॅलीची सुरूवात करण्यात आली. आयोजित केलेली रॅलीचे शिवकॉलनी परिसरातील महिलांनी श्रीराम रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळी व आरती देखील करण्यात आली होत. रॅलीत आकर्षण सजीव देखाव्यात लहान मुलांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता  यांच्या ऋषींच्या वेशांतर केले होते. 

रॅली काढल्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास  परिसरातील गुरूकृपा क्लासेस समोरील मोकळ्या पटांगणात ‘श्रीराम’ नावाचे मोठे दिपोत्सव साजरा करण्यात आला. ‘श्रीरामचंद्र भगवान की जय’ घोषणांनी परिसर दुमदुमला होता. याप्रसंगी श्रीरामभक्त, भजनी मंडळ, जेष्ठ नागरिक व बाल गोपाल यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 


Protected Content

Play sound