शिरसोली येथे जिल्हा विधी प्राधिकरणातर्फे कायदेविषयक बारी माध्यमिक विद्यालयात जनजागृती मार्गदर्शन शिबीर

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मन्यार विधी महाविद्यालय आणि डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयातर्फे बारी समाज माध्यमिक विद्यालयात कायदेविषयक विविध उपक्रम आज सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता राबविण्यात आले. याप्रसंगी गावातून रॅली काढून बेटी बचाव बेटी पढाव जनजागृती रॅली काढण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉ. नयना झोपे यांनी स्त्री भ्रुण हत्या, बेटी बचाव संदर्भात कायद्याची माहिती अवगत केली. यावेळी जिल्हा विधी प्राधिकरणाचे समांतर विधी सहाय्यक आरीफ पटेल यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.  यात लोकन्यायालयाचे आयोजन करणे, कारागृहातील पुरुष व महिला कैद्यांना मोफत कायदेशीर मदत, बालगुन्हेगार मध्यस्थ केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना राबवणे, महिलांचे विविध कायदेशीर अधिकार कामाच्या ठिकाणी होणाऱ्या आर्थिक शोषण गर्भलिंगनिदान असंघटित क्षेत्रातील कामगारांचा हक्क व्यापाराला बळी पडलेल्या महिला व मुले यांना कायदेशीर मदत करणे, मनोरुग्ण व मानसिक विकलांग व्यक्तींना औषधोपचार गरिबी निर्मूलन प्रभावी अंमलबजावणी यासाठी मदत, व्यसनाधीन व मादक पदार्थास बळी पडलेल्या व्यक्तींना कायदेशीर मदत, ज्येष्ठ नागरिक निराश्रित लोकांना शासकीय योजनांचा  मिळवून देणे,बालमजुरी प्रतिबंधक व बालकामगार कायद्याबाबत जनजागृती करणे, पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती, रॅगिंग विरोधी कायदा, सायबर गुन्हेगारी, शिक्षणाचे अधिकार या  बाबत जनजागृतीसह  विविध योजनांच्या बाबतीत सखोल मार्गदर्शन केले

जिल्हा प्राधिकरणाचे  सचिव ए. के. शेख हे अध्यक्षपदी होते.  त्यांनी देखील सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक पी. पी. कोल्हे, उपसरपंच मिठाराम पाटील, माजी सरपंच रामकृष्ण काटोले, माजी उपसरपंच श्रावण ताडे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत अस्वार, गौतम खैरे, पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी, शाळेचे पर्यवेक्षक एस. एस. बारी, संचालक निलेश बारी, प्रवीण पाटील शालीग्राम पवार, भारती कुमावत, विधी सेवा पॅनल ॲड. विजय दर्जी, समांतर विधि सहाय्यक अरिफ पटेल, जावेद पटेल व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी सावंत, संजना बारी व अंजली काटोले यांनी केले.

 

Protected Content